Inspirational Shayari

Posted On: 04-11-2020

नंदकिशोर अरविंद ढेकणे माझी स्वलिखित व स्वरचित कविता विषय : आई ---------------------------------------- अजूनही मला माझ्या आईच्या हातचे जेवण आवडते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते तिच्या हातची आमटी व पोळी काय काय म्हणून सांगू तिच्या हातची चवच किती सुरेख काय काय म्हणून सांगू तिच्या हाताला किती सुरेख चव ती चव मला आवडते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते तिच्या हातची ती गरमा गरम पुरणाची पोळी तीच कटाची आमटी अन बटाट्याची भाजीची ती थाळी तिच्या हाताला किती सुरेख चव ती चव मला आवडते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते तिची ती फोडणीची पोळी अन तो चविष्ट उपमा तोच चविष्ट सांजा अन तोच गरमा गरम उपमा त्या उपम्याची चव मला रोज रोज आठवते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते असतो आम्ही भुकेले तेव्हा ती स्वयंपाक घरात जाते तुमच्यासाठी चविष्ट जेवण जेव्हा ती स्वतःच्या हाताने बनवते तिच्या हाताची ती चविष्ट चव मला अजूनही आठवते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते अशी माझी आई तिची ती पुण्याई तिच्या मायेचा पदर तीच आमची माई येता पाव्हणे घरात तिची ती लगबग आठवते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते त्या माउलीचे हे ऋण सांगा तुम्हीच सज्जन कसे फेडू तिच्या मायेचे ते कर्ज मी कसे चुकवू अशी ही माउली म्हणून ती आई असते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते अजूनही मला माझ्या आईच्या हातचे जेवण आवडते जेव्हा ती आपल्या हाताने तुम्हाला वाढते

Click here to login if already registered or fill all details to post your comment on the Shayari.

First Name*
Last Name*
Email Id*
mobile number*